Kharghar : खारघरजवळ पांडवकडा धबधब्यात बुडून मुलाचा मृत्यू

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (18:32 IST)
Kharghar  :सध्या पावसाळ्यात धबधब्यात वर्षाविहारसहली साठी पर्यटक जातात तिथे अपघात देखील होतात आणि त्यात काहींना प्राण गमवावे लागतात. पोलीस प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी खबरदारी म्हणून जाण्यास बंदी घातली असून देखील तरीही लोक सेल्फी घेण्याच्या नादात आपल्या जीव धोक्यात टाकतात. वर्षाविहार सहलीसाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना खारघर जवळ पांडवकडा येथे शनिवारी घडली आहे. हर्ष गौतम असे या मयत  मुलाचे नाव आहे. .   
 
पांडवकडा धबधब्यावर खारघरात राहणारा हर्ष गौतम हा आपल्या मित्रांसह शनिवारी गेलेला असताना  त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. हर्षचा पाय घसरल्यावर त्याच्या मित्राने त्याला वाचण्याचा प्रयत्न केला असताना त्याच्याही पाय घसरला पण तो सुखरूप बाहेर आला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलांच्या जवानांनी त्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले .

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचण येत होती. त्याच्या मृतदेह अंधारामुळे सापडला नव्हता. सकाळी  मुलाचा मृतदेह ज्या ठिकाणी तो पडला त्या ठिकाणाहून  50 मीटरच्या अंतरावर आढळून आला.     .   
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती