नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

सोमवार, 27 मार्च 2023 (08:38 IST)
नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश उद्धव ठाकरेंना धक्का मानला जात आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे , खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. नाशिकमध्ये ठाण्याप्रमाणे संघटना बांधण्याचे काम केले जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच नाशिकच्या विकासासाठी ठाण्याप्रमाणेच पॅकेज देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. 
 
शिंदे गट शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि विद्यमान उपमहनगर प्रमुख शशिकांत कोठुळे, माजी नगरसेवक उत्तम दोंदे,  माजी नगरसेविका अॅड श्यामला हेमंत दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ शोभा गटकाळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील, प्रभाकर पाळदे, माजी उपमहानगरप्रमुख शरद देवरे , शिवसैनिक निलेश भार्गवे आदींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती