’जनाब’बाळासाहेब ठाकरे… फडणवीसांची शिवसेनेवर टीका!

शनिवार, 19 मार्च 2022 (21:23 IST)
मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. एक-मेकांवर शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले सुरू असलेले दिसतंय. दरम्यान, आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघडीशी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर विशेषत: शिवसेनेवर निशामा साधलाय.
 
काय म्हणाले इम्तियाज जलील?
‘भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर MIM ची महाविकासाघाडीशी युती करण्याची तयारी आहे.’ असं ते म्हणाले. तर, ह्यासंदर्भातला संदेश राजेश टोपेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे पोहोचवावा असंही ते म्हणाले.
 
फडणवीसांची प्रतिक्रीया:
“भाजपचे विरोधक हरले की त्यांना ईव्हीएम दिसते. हरल्यानंतर विरोधक अश्या गोष्टी बोलत असतात. सत्तेसाठी शिवसेना काय काय करू शकते हे आम्ही पाहतोय. शिवसेनेनं ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ ऐवजी ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ स्वीकारलं आहे.” असं ते म्हणाले. “अजानची स्पर्धा सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का ते बघूया. MIMने दिलेल्या या युतीच्या ऑफरचं शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष आहे.” असंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती