जालन्यामध्ये बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "युरोप, दक्षिण कोरिया आणि चीन या भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतायत. त्यामुळे आपण बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्याला आलेलं आहे. हे पत्र जिल्ह्यांच्या कलेक्टरकडे पाठवण्यात आलं आहे. या पत्रानुसार जिल्ह्यांमध्ये योग्य ती कार्यवाही केली जाईल."
"चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढच्याला ठेच, मागचा सावध या पद्धतीने आपल्या राज्यात सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कोरोनासंदर्भातील राज्य सरकार केंद्राच्या अनुषंगाने कार्यवाही करत राहील, असंही राजेश टोपे म्हणालेत.