Jalgaon : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू

बुधवार, 14 जून 2023 (16:34 IST)
काळ कधी आणि कोणाला नेईल हे कोणीच सांगू शकत नाही. शाळेच्या पहिला दिवशी काळाने झडप घातली आणि आठवीच्या विद्यार्थ्याला सोबत नेले. शाळेचा पहिला दिवस त्याच्यासाठी आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला. 
शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्यानंतर सुट्ट्या संपून शाळा सुरु झाल्या आहे. मुलं आनंदानी नवीन दफ्तर, नवीन वह्या-पुस्तक, गणवेश नवा वर्ग, नवे मित्र यांना भेटण्यासाठी आनंदात असतात. शाळेत जाण्यासाठी हौशीने तयारी करून गेलेला विद्यार्थी प्रार्थना म्हणत असताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळला आणि परत उठलाच नाही. त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगावच्या भुसावळ येथे उल्हास पाटील शाळेत घडली आहे. सुयोग भूषण बडगुजर असे या मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. सुयोग सोमवारी शाळेत गेला. शाळेचा पहिला दिवस असल्याने तो खूप आनंदी होता. शाळेत गेल्यावर त्याला प्रार्थना म्हणताना चक्कर आली आणि तो खाली कोसळला. शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. 
 
सुयोगला इडिओपेथिक पल्मोनरी आर्टरी हायपरटेंशनचा आजार असून त्याच्या या आजाराची फेमिली हिस्ट्री आहे.त्याने कार्डिओलॉजिस्टला दाखवले होते. त्याचे आजोबा आणि वडील याच आजारामुळे वारले. सुयोगच्या वडिलांचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला.सुयोगची पुण्याच्या रुग्णालयात दोन दिवसांनंतर अपाईंटमेन्ट होती.त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे शाळेत हळहळ व्यक्त केली जात आहे.    



Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती