लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (09:22 IST)
जनावरांमधील लंपी आजाराचा शिरकाव गुजरात, राजस्थाननंतर महाराष्ट्रातही झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झालंय. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यन्वित झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माहिती दिली की, महाराष्ट्रात लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र निर्माण केले जातील.
 
"लंपीच्या बाबतीत राज्य शासन अतिशय गंभीर आहे. आमचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची टीम यावर काम करत आहे. सर्व अधिकारी, डॉक्टर, पशुपालन विभागाला सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि लस देखील मोठ्याप्रमाणवर उपलब्ध केलेली आहे. डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केले आहेत. कुठेही लशीचा तुटवडा नाही," अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती