आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नाही - दीपक केसरकर

शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (09:18 IST)
"शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी मंत्री झालो," अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत बोलताना शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली.
 
यावर केसरकर म्हणाले की, "सभेतील जल्लोष आणि मतदान यात फरक असतो. हा फरक आदित्य ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे. नेता हा मंचावरुन वेगवेगळे आरोप करण्यासाठी नसतो. गद्दार, खोके म्हणण्यासाठी नसतो तर नेता हा राज्याचा विकास करण्यासाठी असतो."
 
"जे नेते विकास करतात ते जल्लोष करत फिरत नाही. जनतेच्या भावना भडकवून त्यांच्यावर राज्य करण्याचा एक काळ होता. मात्र, आता तो काळ उरला नाही, आता जनतेला त्यांचं हित समजतं. त्यामुळे पिढीला भडकावण्याचं काम करु नये," असंही केसरकर म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती