अबू आझमींच्या भाषणाची चौकशी करा, भातखळकर यांंच अमित शहा यांना पत्र

बुधवार, 27 जानेवारी 2021 (22:07 IST)
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का? याची चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. 
 
"घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे. मोदीजी तुम खतम हो जाओगे", अशी वक्तव्य आझमी यांनी मुंबईतील भाषणात केल्याचं भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अबू आझमी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली असून त्यामागचा बोलवता धनी कोण हे शोधायला हवं, असं आवाहन भातखळकर यांनी केलं आहे. 
 
या आंदोलनाला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भडकाऊ विधानं केली आहेत. आझमी यांनी लोकांना घराबाहेर पडून गोंधळ घालण्याचं आवाहन केलं होतं. यात मोदींबद्दल आक्षेपार्ह विधानं देखील केली आहेत. अबू आझमींनी केलेल्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी २६ जानेवारी २०२१ ला दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ घालण्याचा प्रकार घडला. त्यामुळे अबू आझमींची चौकशी करणं आवश्यक आहे, असं अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती