भंडारा जिल्ह्यासह परिसरात अवकाळी पाऊसाचे संकेत

गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (19:02 IST)
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीव पुन्हा टांगणीला लागलेला आहे. शुक्रवारी (Bhandara) भंडारा जिल्ह्यासह परिसरात अवकाळी पाऊस बरसणार अससल्याचे संकेत (Weather Department Forecast) हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे संरक्षण करावे लागणार आहे. शिवाय पुढील दोन दिवस पिकावर कोणत्याही प्रकारच्या औषधाची फवारणी करु नये असेही कृषितज्ञांनी सांगितले आहे.
 
‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना रहावे लागणार सतर्क
मध्य भारतात मधील काही भागा मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पूर्व विदर्भातील काही भागा मध्ये शुक्रवारी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे लाखांदूर, साकोली, तुमसर व लाखनी ह्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याच तालुक्यात शक्यता जास्त आहे. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि आता असा इशारा देण्यात आल्याने काढणीला आलेल्या पिकावर याचा परिणाम होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती