Shirdi Bandh 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक

गुरूवार, 27 एप्रिल 2023 (13:40 IST)
Shirdi Bandh News महाराष्ट्रातील शिर्डी येथील साई बाबा मंदिर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. दरम्यान 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
 
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला उडवून देण्याच्या धमक्या आल्यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी CISF नियुक्तीच्या निणर्यला नागरिकांनी विरोध केला आहे. तसेच येत्या 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. 
 
शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली आहेत. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी मागणी केली की साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी. यावर साईबाबा संस्थानने कोर्टाच्या निर्देशानंतर केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवली. मात्र शिर्डीतील नागरिकांनी विरोध करत निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. 
 
शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थ आता 1 मे पासून बेमुदत बंद पाळणार आहेत. शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती