मला गायचं होत. पण जाऊ द्या…राज ठाकरे

गुरूवार, 27 एप्रिल 2023 (07:40 IST)
एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की, तुम्ही मेमेक्री खूप छान करता. तर तुम्हाला कोणाची मेमेक्री करायला आवडेल. राज ठाकरे म्हणाले, मी ठरवून मेमेक्री करत नाही. भाषणाच्या ओघात ते होऊन जातं. पण आता मला मेमक्री करायची होती. मला गायचं होत. पण जाऊ द्या… यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, तुम्ही गा…
 
तुम्ही तुमचा बायोपिक केलात तर कोणाला अभिनेता म्हणून घ्याल किंवा तुम्हाला कोणाची बायोपिक करायला आवडेल, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, बायोपिक करायचीच झाली तर इंदिरा गांधी यांच्यावर करता येईल. अमिताभ बच्चन किंवा लता मंगेशकर यांच्यावर करता येईल. कसं असतं संघर्षाचा काळ निघून गेला की सर्व संपत. पुढे काही नसतं. त्यामुळे या दिग्गजांची बायोपिक नक्की करायला आवडेल.
 
महाराष्ट्राचा आवडता मुख्यमंत्री कोण याचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मात्र विलासराव देशमुख हे प्रभावशाली मुख्यमंत्री होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आवडते मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून छाप पाडायला वेळ लागेल. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा बाज राखला. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना कामाचा जो सपाटा लावला तो दाद देण्यासारखा होता, असे राज ठाकरे यांनी सांगिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती