राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

शुक्रवार, 13 मे 2022 (21:11 IST)
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -१०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -१२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन-१५० (जुने दर ११०) हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती