पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मंगळवार, 14 मे 2024 (18:45 IST)
सहकार नगर पोलीस ठाण्यात भाजपच्या विरुद्ध आंदोलन करून बेकायदेशीर जमाव केल्या प्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केला आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता भंग करून बेकायदेशीर जमाव व घोषणा देऊन आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रवींद्र धंगेकरांनी सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. या साठी त्यांनी आंदोलन केले असून या आंदोलनामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

धंगेकरांवर कलम 143, 145, 149, 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 व लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकरांनी करील असून जो पर्यंत कारवाई करत नाही तो पर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही म्हणत त्यांनी पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता.मध्य रात्री पर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंधळ सुरु असल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. कायद्याने सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. आज रवींद्र धंगेकरांवर त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Edited by - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती