वारी लसीकरण सुरु आहे. शहरात सोमवारी 12 केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर 54 केंद्रांवर मिळणार कोविशील्ड लस मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. यासाठी केंद्रांवर सकाळी 9 वाजता टोकन वाटप सुरु होईल. दरम्यान नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.
# खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
# आचार्य अत्रे सभागृह, वायसीएम रुग्णालयाजवळ, पिंपरी
# नविन जिजामता रुग्णालय
# यमुनानगर रुग्णालय
# अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
# सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल, भोसरी
# क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (जुने तालेरा रुग्णालय), चिंचवड
सोमवारी 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थी, एचसीडब्ल्यू, एफएलडब्ल्यू गटातील लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्याच्या दरम्यान म्हणजे 84 ते 112 दिवसाच्या कालावधीत) शहरातील 54 लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवर 100 लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल.