पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न

गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (08:54 IST)
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ आणि जय ही त्यांची दोन्ही मुलंही उपस्थित होती. तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी कोरोनातून मुक्ती मिळो, असे साकडे अजित पवार यांनी विठ्ठलाला घातले.
 
यावेळी कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक सुंदर फुलांनी सजवण्यात आले आहे. पहाटे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यासाठी पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी मंदिरात पुष्प सजावट केली. पिवळा, केशरी झेंडू, पांढरी शेवंती, जरबेरा लाल, पिवळा, पांढरा, केशरी आणि ऑर्किड अशा फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी आणि सभामंडपाला फुलांची आरास करण्यात आली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती