खंडाळ्यात माकडाचा धुमाकूळ, पर्यटकांना जखमी केले

सोमवार, 2 मे 2022 (19:18 IST)
सध्या उन्हाळा सुरु आहे. अशा परिस्थितीत पर्यटक थंडगार हवा असलेल्या ठिकाणी जात आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लोणावळा आणि खंडाळा परिसरात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. या माकडांनी गिरीजा हॉटेल, आयसीआय लर्निग होम, दगडी बंगला येथील सुरक्षा रक्षकांचा या माकडांनी चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे. या माकडांना पकडण्यात रविवारी वनविभाग व शिवदुर्ग मित्राच्या गटाला यश आले असून आता पर्यटकांना या माकडांपासून मुक्ती मिळाली आहे. 
 
गेल्या दीड महिन्यांपासून या माकडांनी उच्छाद मांडला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून वन विभागाने या माकडांच्या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला पण ते माकड खासगी बंगल्यामध्ये लपून जातं असल्यामुळे त्यांना पकडण्यात यश मिळाले नाही. या माकडांमुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. शिवाय या माकडांनी 28 जणांना जखमी केले होते. आता या माकडांना पकडण्यात मात्र वनविभाग पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे च्या माणसांना यश मिळाले आहे. माकड पकडल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती