मुंबई ते पुणे केवळ तीन तासांत, दोन वंदेभारतचे उद्घाटन होणार

बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (21:11 IST)
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन येत्या शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या गाडीच्या मुंबई ते पुणे चेअरकार प्रवासाचे तिकीट 560 रूपये आणि एक्झुकेटीव्ह चेअरचे तिकीटासाठी तब्बल 1,135 रूपये लागणार आहेत. मुंबई ते पुणे मार्गावरील वंदेभारत ही ट्रेन या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत महाग आणि जलद गाडी  ठरणार आहे, या गाडीने मुंबई ते पुणे केवळ तीन तासांत गाठता येणार आहे.
एक ट्रेन मुंबई – पुणे – सोलापूर मार्गावर धावेल तर दुसरी ट्रेन मुंबई – नाशिक – साईनगर शिर्डी मार्गावर धावणार आहे. या दोन्ही ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत झाली आहे.  वंदे भारत ट्रेनचे तिकीट या मार्गांवर धावणाऱ्या सर्व ट्रनेपेक्षा महाग असणार आहे.
 
नवीन वंदेभारतचे मुंबई ते पुणे प्रवासाचे चेअरकारचे तिकीट 560  रूपये तर एक्झुकेटीव्ह क्लासचे तिकीट 1,135 रूपये असणार आहे. ही मुंबई ते पुणे मार्गावरील सर्वात महागडी ट्रेन ठरणार आहे. मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर अवघ्या तीन तासांत कापता येणार आहे.
 
दोन नव्या वंदेभारतचे वेळापत्रक पाहा
मुंबई – साईनगर ट्रेन क्र 22223  : सीएसएमटीहून स.6.20 वा. सुटेल तर दादरला ती 6.30 वा., ठाणे येथे स.6.49 वा., नाशिक रोड येथे 8.57 वा. तर साईनगर – शिर्डी येथे स.11.40 वा. पोहचेल.
 
साईनगर – मुंबई  ट्रेन क्र.22224 : ही परतीच्या प्रवासाची ट्रेन क्र.22224 साईनगर- शिर्डी ट्रेन सायं.5.25 वा. शिर्डीहून सुटेल आणि अनुक्रमे नाशिक रोडला रा.7.25 वा., ठाणे येथे रा.10.05 वा., दादरला रा.10.28, आणि सीएसएमटीला रा.10.50 वा. पोहचेल असे रेल्वेने म्हटले आहे.
 
मुंबई – सोलापूर ट्रेन क्र. 22225  :  हि ट्रेन सीएसएमटीहून दु.4.05 वा. सुटून दादरला दु. 4.15 वा., कल्याणला दु.4.53 वा. पुण्याला साय. 7.10 वा. तर कुर्डूवाडीला रा.9.00 वा. तर सोलापूरला रा.10.40 वा. पोहचेल. ही ट्रेन पुण्याला तीन तासांत पोहचणार आहे.
 
सोलापूर – मुंबई ट्रेन क्र.22226 : परतीच्या प्रवासासाठी सोलापूरहून स. 6.05 वा. सुटून कुर्डूवाडीला स.6.53 वा., पुण्याला स.9.20 वा., कल्याणला स.11.33 वा. तर दादरला दु. 12.12 वा.पोहचेल, तर सीएसएमटीला दु.12.34 वाजता. पोहचेल. या ट्रेनला येताना तीन तास पंधरा मिनिटे लागणार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती