चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस शहरात गजानन मडावी यांचं हे घर कोळसा खाणींच्या जवळ होतं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात शहरा शेजारी सर्वत्र भूमिगत कोळसा खाणी आहे. सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पण अशी घटना प्रथमच घडल्याचे सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी अचानक गजानन मडावी यांना राहत्या घरात हादरे पडल्याचे आणि घर हलू लागल्याचे जाणवले . ते घाबरून कुटुंबासह बाहेर पडले आणि पाहता-पाहता त्यांचे राहते घर 70 फूट जमिनीत गाडले गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि भीती पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिसरातील वीज पुरवठा बंद केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.