कोणत्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेला जाईल

गुरूवार, 27 मे 2021 (16:07 IST)
कोणत्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेला जाईल, अशी ठाम भूमिका वारकरी व महाराज मंडळींनी घेतली आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी दिली आहे. 
 
आषाढी पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे महाराष्ट्रातील वारकरी आणि महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आणि मानाच्या सात संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणण्यात आल्या. त्यानंतर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी सोहळा पार पडला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती