अपघातात बालकाला सहा किलोमीटर फरफटत नेलं , बालकाचा मृत्यू

सोमवार, 21 मार्च 2022 (15:06 IST)
धावतवाडी तालुका जत येथे मोटारी ने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले तर त्यांच्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचा अंत झाला. अब्दुल समद असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. विजापूर -गुहागर राष्ट्रीय महामार्गावर धावतवाडी गावातील रहिवासी साजिद लालखान शेख आणि त्यांची पत्नी जाबिना साजिद शेख आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अब्दुल समद ला घेऊन दुचाकीने मळ्याकडे निघाले असतानां पाठी मागून वेगाने येणाऱ्या मोटारीने जांभुळ्वाड़ी फाट्याजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक जोरदार असल्यामुळे साजिद हे जोराने उडून रस्त्यावर फेकले गेले. तर त्यांची पत्नी आणि मुलगा मोटारीच्या बंपर मध्ये अडकून तीनशे मीटर फरफटत गेले. काही वेळाने जबीना या रस्त्यावर पडल्या. पण चिमुकला अब्दुल समद मोटारीच्या बम्पर मध्येच अडकून राहिला  आणि मोटारीसह वेगाने फरफटत होता. 

पुढे महामार्गावरील चोरी येथील बस स्थानकावर काही नागरिकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी मोटार चालकाला आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही मोटार चालक वेगाने वाहन पळवत  होता. काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. आपला पाठलाग करत  हे कळतातच चालकाने मोटार रस्त्याच्या कडेला थांबविली आणि बम्पर मध्ये अडकलेल्या मुलाला बाजूला काढत पुन्हा मोटार पळवू लागला. तेवढ्यात नागरिकांनी आला अडवून चांगलाच चोप दिला. शेख यांचे काही नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अब्दुलसमद ला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शेख पती-पत्नींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु  आहे. पोलिसांनी आरोपी मोटारचालक आणि मोटरला ताब्यात घेतले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती