एसटी कमचाऱ्यांच्या अंतरिम पगारवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
या घोषणेनंतरही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही कायम आहे.
अशावेळी अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक 26 नोव्हेंबरला पार पडली.
या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षांचा करार यावर विचार होऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले.