शेतकरी महिलेने कॉल रेकॉर्डिंगसह तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दादाराव इंगोले याच्याविरुद्ध ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या आगोदर बँकेच्या अधिकाऱ्याने अशीच मागणी केली होती. बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेती कर्ज मंजूर करण्यास शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तो या प्रकरणी तुरुंगात आहे. लागोपाठ या प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडितेच्या पतीकडे चार एकर शेती आहे. दुग्ध व्यवसायाकरिता तिने नायगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव इंगोले याच्याकडे ५ लाखांचे कर्ज पाहिजे असे निवेदन दिले होते. या कर्ज प्रकरणी इंगोलेने दहा लाखांचे कर्ज मिळवून देतो असे सांगतिले होते. मात्र महिलेने कागदपत्रे देऊन सहा महिने झाले तरी कर्ज मिळालेच नाही असे नमूद केले. अशी विचारणा केल्यावर इंगोलेने ‘तू जर माझ्या कामी येत असशील, तर मी तुझे काम लवकर करून देतो,’ असे म्हटले आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.