सूडाचं राजकारण करुन शरद पवारांची सुरक्षा हटवण्यात आली असेल तर ते चुक आहे

शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (15:26 IST)
शरद पवार हे देशासाठी महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची सुरक्षा परत देण्यात यावी, अशी मागणी पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पवारांच्या दिल्लीतील घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान मोदी सरकारकडून हटवण्यात आले आहेत.
 
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना किंवा कोणता नेता देशासाठी महत्त्वाचा आहे, त्यांना सरकारनं सुरक्षा पुरवणं आवश्यक आहे. सुडबुद्धीनं सुरक्षा हटवण्यासारखा निर्णय घेणं अयोग्य आहे,” असं रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसतानाही त्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
 
यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरही आपलं मत व्यक्त केलं. “फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती