भारताला 'भारत' ठेवायचं असेल तर हिंदुंना 'हिंदू'च राहावं लागेल-मोहन भागवत
रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (10:08 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुंनी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मोहन भागवत यांनी हिंदुंची संख्या आणि शक्तीही कमी झाल्याचं म्हटलं आहे. हिंदुंना हिंदू राहण्यासाठी भारत अखंड राहायला हवा आणि भारताला 'भारत' राहायचं असेल तर हिंदुंना 'हिंदू'च राहावं लागेल, असं भागवत म्हणाले.
भारताशिवाय हिंदू आणि हिंदूंशिवाय भारत अशी कल्पनाच शक्य नसल्याचं भागवत म्हणाले. भारत म्हणजे हिंदुस्तान आहे आणि यातून हिंदू वेगळा होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
धार्मिक लोकसंख्येचा उल्लेख करतही भागवत यांनी काही मुद्द्यांकडे संकेत केला. सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता कुठे आहे? देशाच्या अखंडतेला आणि एकतेला धोका कुठे आहे? ते पाहा असं भागवत म्हणाले.