हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अहमदाबाद चे नामांतर कर्णावती करुन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मालाड येथे होणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्यासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल, असे सांगून हेमराज शाह म्हणाले की, अहमदाबादला कर्णावती हे नाव आहे. परंतु रीतसर कर्णावती हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नांवाला सुद्धा एक इतिहास आहे.