Puja Khedkar: IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे अकादमीने प्रशिक्षण रद्द करून परत बोलावले

मंगळवार, 16 जुलै 2024 (19:42 IST)
वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण रद्द करण्यात आले असून अकादमीत परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने पूजा खेडकरचे आयएएस प्रोबेशन पुढे ढकलले आहे. त्यांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे.त्यांना दिलेल्या पत्रकामध्ये तुमचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करून  पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी तुम्हाला ताबडतोब परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पूजा खेडकर ही 2023 च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. पूजा खेडकरवर स्वत:ला ओबीसी नॉन-क्रिमी लेयर श्रेणीतून असल्याचा दावा करून यूपीएससीमध्ये निवड झाल्याचा आरोप आहे. मानसिकदृष्ट्या अपंग असल्याचाही तिच्यावर आरोप आहे, मात्र अनेकदा फोन करूनही ती वैद्यकीय तपासणीला आली नाही. अलीकडे, तिला व्हीआयपी ट्रिटमेंटच्या मागणीवरून वादात सापडले होते. त्यानंतर त्यांची पुण्याहून वाशीम येथे बदली झाली. 
 
पूजा खेडकर यांनी त्यांच्या चारचाकी गाडीवर 'महाराष्ट्र शासन' असं लिहिल्यामुळे आणि गाडीवर अंबर दिवा लावल्याच्या संदर्भात पुणे वाहतूक विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे.
पूजा यांच्यावर प्रशिक्षण काळात सरकारी निवास, कर्मचारी, कार, आणि कार्यालयात स्वतंत्र केबिन ची मागणी करण्याचा आरोप आहे. 

आयएएस होण्यासाठी त्यांनी खोट्या कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यूपीएससी फॉर्ममध्ये स्वत:ला ओबीसी नॉन-क्रिमी लेयर म्हणून घोषित केले.

पूजाने अपंगत्व श्रेणी अंतर्गत यूपीएससी अर्ज भरला होता. ती 40 टक्के नेत्रहीन होती आणि ती काही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ती प्रत्येक वेळी मेडिकलच्या वेळी हजर राहिली नाही.
एमबीबीएस महाविद्यालयात प्रवेश घेत असतानाही कागदपत्रे खोटी केल्याचा आरोप पूजावर आहे

Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती