चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीला अटक

शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (08:55 IST)
कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील  कणेरी माधवनगर येथील एक धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या  करुन पतीने खुद्द आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुरुवारी (16 सप्टेंबर) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. कोमल निशिकांत चव्हाण (वय 25,) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, शशिकांत सुरेश चव्हाण (वय 30) असं आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक  केली आहे.

याबाबत माहिती अशी, कोमल व निशिकांत चव्हाण  ( रा.डवरी वसाहत, दौलतनगर कोल्हापूर ) यांचा 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 2 मुले असून निशिकांत हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये कामाला आहे. तो कामानिमित्त कणेरी येथील माधवनगरमधील एकता कॉलनी येथे दीपक पोवार यांच्या घरात भाड्याने राहत होतो. अलीकडच्या काही दिवसात पत्नी कोमलचे दुसऱ्या एकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निशिकांतला आला. त्यामुळे या दोघा पती-पत्नीमध्ये सतत वाद झाला. याबाबत फिर्यादी संतोष चव्हाण  यांनाही सांगितले होते. दरम्यान, कोमल सुधारली नाही तर मी तिला ठार मारणार, असे निशिकांत बोलत होता.

बुधवारी रात्री या पती-पत्नीत वाद झाला. या वादात पती निशिकांत याने चारित्र्याच्या संशयावरून नायलॉनच्या दोरीने कोमलचा गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्यानं गुरुवारी सकाळी फिर्यादी मामा संतोष चव्हाण यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. कोमलला ठार मारले आहे आणि मी स्वतः आत्महत्या  करणार आहे असे सांगितले. मात्र काही वेळाने मामा आणि नरेंद्र दोघे घरात आले. मात्र, निशिकांत हा राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेऊन स्टूलवर आत्महत्या करत असल्याचा दिसला. पण दोरी तुटली आणि आत्महत्येचा प्रयत्न फसला. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली नोंद झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रवीण पाटील  करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती