HSC Result 2023 : राज्यात बारावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी 96.01

गुरूवार, 25 मे 2023 (11:21 IST)
HSC Board Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.

राज्यात कोकण विभाग अव्वल, अव्वल विभागाचा निकाल 96.01 % इतका लागला आहे.
 
मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.13% टक्के इतका लागला आहे.
 
निकालात यंदाही मुलींची बाजी
 
यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी..विद्यार्थिनींचा एकूण निकाल93.73 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे.
 
23 विषयांचा निकाल 100 %
 
एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.
 
या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार
 
https://www.mahahsscboard.in/ 
 mahresult.nic.in, hscresult.mkcl.org
mahresults.org.in
 
कला , वाणिज्य ,विज्ञान आणि तांत्रिक शिक्षणाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील पदवीच्या शिक्षणासाठी काही निर्णय घेता येऊ शकते. विद्यार्थी ऑनलाईन निकाल वरील संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतील. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती