समृद्धी महामार्गावर तुम्हाला किती टोल भरावा लागणार?

शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (08:02 IST)
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला. मात्र, त्याच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचं अंतर वेगाने पार करता येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या द्रुतगती मार्गाचं नामकरण करण्यात आलं आहे. यानंतर या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार? यासंदर्भात वेगवेगळी माहिती आणि अंदाज समोर येत होते. मात्र, आता पहिल्यांदाच महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

वाहन प्रकार आणि त्यासाठीचा टोल…
१. मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतीकिमी
२. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस – २.७९ रुपये प्रतिकिमी
३. बस अथवा ट्रक – ५.८५ रुपये प्रतिकिमी
४. तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रुपये प्रतिकिमी
५. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – ९.१८ रुपये प्रतिकिमी
६. अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – ११.१७ रुपये प्रतिकिमी
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती