त्यावेळी फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे दोन वर्षे व्यस्त होते का?”

गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (16:10 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून राज यांनी ही मागणी केल्यानंतर आता शिवसेनेनं या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना भाजपासंदर्भात इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे गट आणि मनसेमधील जवळीक वाढत असताना मुंबईचासंदर्भ देतच शिवसेनेनं हा इशारा दिला आहे.
 
तळेगावमध्ये ११०० एकर जागेवरील प्रकल्प गुजरामध्ये हलवण्याचा निर्णय ‘वेदान्त’ने मंगळवारी जाहीर करत गुजरात सरकारसोबत समांजस्य करार केला. याच संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याचं खापर आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर फोडलं. “या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल,” असं शिंदे म्हणाले. याचवरुन उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
 
“मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. त्यावेळी फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे दोन वर्षे व्यस्त होते का?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती