नाशिक शहरात आयसीसी चॅम्पियन्स ट्राफीच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा विजयाचा आनंद देशभरात साजरा करण्यात आला. नाशिकात रस्त्यावर करत असलेल्या अतिशबाजीची ठिणगी एका घरात पडली आणि घराला आग लागली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास कॉलेज रोड परिसरात ही घटना घडली.
अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमनदलाचे जवान आग विझवताना जमलेल्या काही तरुण अग्निशमन दलाच्या वाहनावर चढून त्यावर नाचू लागले. पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जन हानी झाली नाही.