हिंदूस्तानी भाऊचा वकिलांकर्वींचा विद्यार्थ्यांना संदेश : माझा व्हिडीयो किंवा ऑडीओ येत नाही कुणी आंदोलन करू नये

बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (11:07 IST)
ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, यासाठी महाराष्ट्रातल्या विविध शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी काल (31 जानेवारी) आंदोलन केलं. हे आंदोलन 'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहानानंतर केल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.
 
त्यानंतर 'हिंदुस्थानी भाऊ'वर सर्वच स्तरातून टीका सुरू झाली. आज (1 फेब्रुवारी) मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, जमावबंदी आदेश, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम यांसह विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ) आणि इकरार खान वखार खान या दोघांना अटक करण्या आली.
 
सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने (Student Protest) संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राज्य सरकारला तर या आंदोलनाने घाम फोडला.  राज्य शिक्षण मंडळाच्या म्हणजेच SSC,HSC बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या या मागणीसाठी आज (31 जानेवारी) मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
 
आंदोलनासाठी मुंबईत धारावी येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली. रस्त्यावर शेकडो विद्यार्थी एकत्र आले आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी त्यांनी केली.
 
 या आंदोलनाच्या मागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केल्यानंतर त्यांच्यासमोर हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) हे नाव आलं त्यानंतर पोलिसांच्या हाती आंदोलनामागे असणार काही अन्य व्हिडिओही लागले. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्याला तीन दिवस कोठडी मुक्कामी धाडलं, मात्र जो पर्यंत माझा व्हिडीयो किंवा ऑडीओ येत नाही कुणी आंदोलन करू नये, हिंदूस्तानी भाऊचा वकिलांकर्वी विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे. वकिल महेश मुळ्ये यांनी व्हिडीयो जारी करत दिली माहीती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती