भाजपचे सहयोगी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले, "ठाकरे हिंदुत्वाबद्दल बोलतात पण त्यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात भाग घेतला नाही. महाकुंभात सहभागी न होऊन ठाकरे आणि गांधी कुटुंबाने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. हिंदू असणे आणि महाकुंभात सहभागी न होणे हे हिंदूंचा अपमान आहे आणि हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, की, "लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी महाकुंभात सहभागी व्हायला हवे होते. त्यांना नेहमीच हिंदू मते हवी असतात, तरीही त्यांनी महाकुंभात भाग घेतला नाही. मला वाटते की हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा." रामदास आठवले म्हणाले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी या नेत्यांना धडा शिकवला आहे.