येत्या 36 तासांत भरतीच्या वेळी समुद्रात 5 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या मोठ्या लाट्या येण्याची शक्यता भारतीय हवामान खाते आणि मुंबई महापालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात बोटीने जाणे अथवा समुद्र किनारी पर्यटकांनी जाणे टाळावे. यामुळे कोणताही धोका उदभवू शकतो. अशा इशारा भारतीय हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस यांनी मुंबईकरांना दिला आहे.
या साठी मुंबई महापालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून अग्निशमन दल, नौदल, पोलिसांना सज्ज केले आहे. रात्री 9 वाजता समुद्रात मोठी भरती असून त्यावेळी समुद्रात 4.08 मिटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन (INCOIS) नुसार, शनिवारी सकाळी 11.30 ते रविवारी रात्री 11.30 पर्यंत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. बीएमसी आयुक्त भूषण गागारिन यांनी नागरिकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी शहरातील समुद्रकिनाऱ्यांवरील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश नागरीकांना दिले आहेत.