अवजड वाहनांच्या टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ

शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:11 IST)
आधीच्या सरकारच्या काळात हलक्या वाहनांना देण्यात आलेल्या टोलमाफीमुळे होणारी ३५० ते ४०० कोटींची तूट भरून काढण्यासाठी ट्रक, बस आणि अवजड वाहनांच्या टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हलक्या वाहनांना ५३ नाक्यांवरील टोलमाफी मात्र कायम राहणार आहे.
 
टोलनाके बंद झाल्याने ठेकेदारांना दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची नुकसानभरपाई द्यावी लागते. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वस्तू व सेवा करापोटी नुकसानभरपाईची मोठी रक्कम केंद्राकडे थकित आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे ठेके दारांना टोलची नुकसानभरपाई सरकारी तिजोरीतून देणे सरकारला कठीण जात होते. त्यावर उपाय म्हणून टोलच्या दरात सरासरी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
नवे दर
* ठाणे-भिवंडी-वडपा : मिनी बस व टेम्पो – ८५ रुपये, ट्रक- बस – १७५ रुपये
* भिवंडी चिंचोटी -कामण-अंजूरफाटा ते मानकोली : मिनी बस व टेम्पो – ८५ रुपये, ट्रक व बस – १२५ रुपये
* पुणे – नगर : मिनी बस व टेम्पो – ८५ रु., ट्रक व बस – १७५ रु.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती