हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील शाखेच्या प्रवासास पोषक वातावरण नसल्याने त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्र प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सून येता येता थांबला आहे. (Weather update)दरम्यान, राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात 2 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या कोरडया, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.