कोकणात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट

गुरूवार, 25 मार्च 2021 (21:31 IST)
राज्यातील तापमानात वाढ झाली असून कोकणात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. 
 
कोकण, गोव्याच्या बर्‍याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंशाने वाढले आहे. क़ोकण गोव्याच्या बर्‍याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती