मागील दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढत असून, थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर आणि कोकण वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथे 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाले असून, या उन्हाळ्याच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 2 दिवसांपासून राज्यातील किमान तापमाना सोबतच कमाल तापमानातही लक्षणीय वाढले आहे. तर येत्या 29 एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या लाटेमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपूरी, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर या विविध जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये तापमानाने चाळीस डिग्री तपमान नोंदवले गेले आहे.
नागपूर – 45.2 अंश सेल्सिअस
अहमदनगर – 44.9 अंश सेल्सिअस
जळगाव – 44.4 अंश सेल्सिअस
सोलापूर – 44.3 अंश सेल्सिअस