हृदयद्रावक ! औषधाची गोळी खाताना ठसका लागून तरुणाचा दुर्देवी अंत

रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (12:20 IST)
करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील  गुरव कुटुंबियांवर नियतीने घात केला.या कुटुंबातील एकुलता एक तरुण मुलगा याचे औषधाची गोळी श्वासनलिकेत अडकून जीव गुदमरून दुर्देवी अंत झाला.या घटनेमुळे गुरव कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.प्रतीक प्रकाश गुरव (17)असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे शंकर गोविंद कुटुंब गावातील शेती व्यवसाय करणारे कष्टाळू कुटुंब आहे. प्रतीक हा यांचा एकुलता एक मुलगा होता. तो नुकताच दहावी उत्तीर्ण होऊन इयत्ता अकरावीत सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतला होता. शासकीय सेवेत दाखल होण्याचे त्याचे स्वप्न होते.परंतु काळाने झडप घातली आणि त्याचे शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. प्रतीकला किरकोळ सर्दी खोकला झाला होता त्यामुळे त्याने एका खाजगी रुग्णालयातून औषधोपचार घेतले.संध्याकाळी औषध घेताना  गोळी घेताना जोराचा ठसका लागून श्वास नलिकेत गोळी अडकल्याने जीव गुदमरून त्याचा दारुण अंत झाला.कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले पण, डॉक्टरनी त्याला तपासल्यावर तो मृत झाल्याचे सांगितले.कुटुंबियांवर वज्रपातच झाला.

रात्री उशिरा त्याच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकूलत्या एक मुलाची अशा प्रकारे एक्जझिट झाल्यामुळे गुरव कुटुंबीय हादरले आहे.प्रतीक खूप मनमिळाऊ आणि गुणी मुलगा असल्याने सर्वत्र गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे 17 ऑक्टोबर म्हणजे आज त्याचा वाढदिवस होता आणि दुर्देवाने आजच्या दिवशी त्याचे रक्षा विसर्जन करावे लागल्यामुळे काळजाला चटका लावणारी ही घटना आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती