"विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, शौर्य यांच्याबाबत शंका घेता येणार नाही. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे", असं अमित शाह यांनी म्हटलं.
"सावरकर यांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नाही. तर देशातील 130 कोटी लोकांनी त्यांना ती त्यांच्या देशप्रेम, शौर्याबद्दल बहाल केली आहे. त्यांनी कारावासात पशूवत यातना भोगत घाम गाळला. त्यांना दोन जन्मठेपा झाल्या होत्या. त्याबद्दल तुम्ही शंका कशी घेऊ शकता", असा प्रश्न शाह यांनी यावेळी केला.