महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आजच

मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (11:49 IST)
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी आजच होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.तारीख वारंवार पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सादर केलं होतं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घेण्यासाठी मान्यता दिली आहे. 
 
यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेच्या वकिलाने हे प्रकरण महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्वोच्च नायल्यात तातडीनं मेन्शन केलं आणि आज या प्रकरणावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाचा आजसाठी समाविष्ट नव्हतं. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. त्यावर शिवसेनेच्या वकिलाने हे प्रकरण मेन्शन केलं आणि आज दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे..
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती