"सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहा, आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भेटीगाठी वाढवा," असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं.
पक्षाच्या पुणे ग्रामीणमधील तीन लोकसभा मतदारासंघांसाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून पुणे ग्रामीणमधील मावळ, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारासंघांतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात मावळ लोकसभा मतदारसंघात किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते यांची पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदावर अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारामतीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.