शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही गटांकडून अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे सुनावणीही संपली असून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. पण हा निर्णय कधी येणार याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
 
अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर बुधवारी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असे करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.
 
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ११ मे रोजी अंतिम निकाल दिला. अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घेऊन आमदार अपात्रता प्रकरणातील निकाल देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच खऱ्या अर्थाने १४ सप्टेंबरला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी सुरू झाली. यामध्ये अध्यक्षांसमोर दोन्ही गटाच्या बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वकिलांची फौज लावण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती