कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या बातमी मध्ये एक दिलासादायक बातमी येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 36 जिल्ह्या पैकी 12 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली आहे. जरी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली असली तरी बाकीच्या जिल्ह्यात अजून कोरोना बाधित सक्रिय रुग्ण आहे. त्यांच्यावर योग्य उपचार देऊन त्यांना कोरोना मुक्त करणे हेच आपले लक्ष्य आहे.
हे सर्व मोठ्या प्रमाणात चाचण्या होत आहे त्यामुळे झाले आहे.असे ही ते म्हणाले चाचण्याचे प्रमाण कुठे ही कमी न झाल्यामुळे पॉझिटिव्ह रेटमध्ये 5 टक्यांची घट झाल्याचे निर्देशनासआले आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.