Grampanchayat Election Result 2022: ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज
सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (10:25 IST)
Grampanchayat Election Result 2022:राज्यात 16 जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींचा आज निकाल, 608 पैकी 61 जागा बिनविरोध, उर्वरित जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंच निवड होणार, 16 जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरुवात.
राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून सर्व राजकीय पक्ष निकालाची वाट पाहत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील 547 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल सरासरी 76 टक्के मतदान झाले.
एकूण 608 ग्राम पंचायत पैकी 51 ग्राम पंचायतीमध्ये निवडणूक बिनविरोधात झाले. आता सर्व पक्षांचे लक्ष उर्वरित 547 ग्रामपंचायतीच्या निकालाकडे आहे. 10 वाजता मत मोजणीला सुरुवात होणार असून दुपारी निकाल जाहीर केला जाईल.
नाशिक जिल्ह्यातील एकूण 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. या यापैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध पार पडल्या तर 8 सरपंच बिनविरोध निवडून आलेत.
दिंडोरी तालुक्यातील 4 ग्रामपंचायत, कळवणमधील 2 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यात.
16 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली याची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या.काल एकूण 608 ग्रामपंचायतींपैकी 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.