शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप याबाबत कुणालाच परवानगी देण्यात आली नाही. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठीही दोन्ही गटाकडून अर्ज करण्यात आले होते. शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. तर शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या दसरा मेळाव्यावरुन नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई ही शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाची आहे. उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वासाठी हा दसरा मेळावा महत्वाचा वाटतो का? पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरुन उतरले त्या दिवशी त्यांच अस्तित्व संपल. उद्धव ठाकरेंच अस्तित्व मातोश्रीपुरतचं मर्यादित होतं. त्यांच अस्तित्व महाराष्ट्रात आणि देशात कुठंच नाही. ते फ्क्त मातोश्रीच्या कक्षेपुरतचं मर्यादित होतं, असा टोलाही राणेंनी लगावला.