गेले काही महिने राज्यपाल विविध वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. राज्यपालांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होते आहे.महापुरुषांच्या अपमान केल्याबद्दल त्यांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. आपल्या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईत एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडले आहे.मुंबईत राजभवनात एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
"राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र असे लोक येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत,"मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.