भगतसिंह कोश्यारी म्हणतात, 'राज्यपाल होण्यात दु:खच दु:ख, सुख काही नाही'

रविवार, 8 जानेवारी 2023 (10:53 IST)
"राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. मात्र असे लोक येतात तेव्हा कधी कधी बरं वाटतं. मी आता 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे मी तर काही आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. अशा लोकांजवळ येतो तेव्हा त्यांचा सुगंधही लागतो. जैन तीर्थ सर्कीट बनवलंय. सरकारला आवाहन आहे, पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्राचं मंत्रालयही व्हावं. सर्वच मुमूक्षू, मुनी राज्यपाल बनू शकत नाहीत," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
 
मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेले काही महिने राज्यपाल विविध वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. राज्यपालांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे हे उद्गार परतीचे संकेत तर नव्हे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.
 
"छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, चंद्रशेखर, लोकमान्य व्हावेत अशी सगळ्यांची इच्छा असते, पण आपल्या नाही तर दुसऱ्यांच्या घरात जन्माला यावा, अशी भावना असते," असं कोश्यारी म्हणाले.. 'लोकमतन्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती