विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. हा वाद आता काहीसा शमला आहे.
पण भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. खालच्या पातळीची भाषा वापरत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
आणखी वाचा
अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संभाजी महाराज धर्मवीर नसते तर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं.”