शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिरिक्त ऊस गाळपासाठी मुख्यमंत्र्यांकडून अनुदान जाहीर

मंगळवार, 17 मे 2022 (20:44 IST)
1 मे पासून अतिरिक्त ऊस गाळप होणाऱ्या ऊसासाठी 200 रुपये प्रति टन उसाला अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अतिरिक्त ऊस गाळप अनुदान निश्चित करण्यासंदर्भात आज बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत पाच रुपये प्रती टन वाहतुकीला देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ऊस गाळप होईपर्यंत राज्यातील साखर कारखाने सुरु ठेवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
येत्या 1 मे 2022 पासून गाळप होणाऱ्या आणि साखर उताऱ्यामध्ये 10 टक्केपेक्षा 0.5 टक्के घट कमी आलेले व अंतिम साखर उतारा 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी होणारे कारखाने घट उतारा अनुदानास पात्र राहतील, असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. सध्या 12 महिन्यांचा ऊस 18 महिन्यांपर्यंत गेला आहे. यामुळे या अनुदानाचा किती फायदा शेतकऱ्यांनी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती